Category Archives: Uncategorized

हे जमणार की नाही?

“सवाssssल!” आपल्याला नाही जमणार अस काही असत?

Winking smile

Advertisements

“मी ते केलं नसतं तर…”

“वेळ” ही फारच गमतीदार गोष्ट आहे. कधी वाटत आपल्याकडे तो चिक्कार आहे. इतका की शून्यात विचार करत बसण्यातसुद्धा तास निघून जातात.पण कधी कधी तो इतका कमी असतो, इतका कमी, की किती वेळ उरलाय हे सुद्धा बघायला तो नसतो. ती गोष्ट वेगळी की वेळ कमी असतानासुद्धा  जास्त वेळ “किती वेळ उरलाय” याचं गणित करण्यातच जातो, पण असो.

??????

कित्येक वेळा विचार करत असताना माझ्या मनात हा विचार येतो की “चायला मी ते केलं नसतं तर” किंवा “अरे यार, ते अस करायला पाहिजे होतं”.

आता “ते” काहीही असू दे,  आता त्याबद्दल विचार केल्यानी काही फरक पडणारेका ? असा विचार केला तरी बुचकळ्यात.

पूर्वी केलेल्या चुका पुन्हा नाही करायच्या अस मानून “आपण काय काय चुका केल्या” याचा हिशोब ठेवत बसायच? की झाल ते झालं, त्याचा आणि पुढे होणाऱ्या गोष्टींचा काहीही संबंध नाही हे मानून वागायच? नाही कळत मला..चुका कशाला म्हणायच आणि बरोबर वागणं काय? ते कोण ठरवत? मीच ना? म्हणून वाटत की काहीही संबंध नाहीये काल आणि आजचा.पण मी आज जो कोणी आहे तो मी काल जो कोणी होतो त्यामुळेच  ना ? मग अस कस? चूक केली तर त्याबद्दल विचार करत राहणार तो मीच आणि काही छान केलं तर त्याबद्दल विचार करत राहणार तो पण मीच.पण मी एकटा नाहीये इथे. हा प्रश्न सगळ्यांना पडत असणार, कळत नकळत त्याच उत्तर शोधून सगळे काहीतरी करत असणार.

खूप आधांतरी विचार वाटत आहेत हे सगळे..  पण असा विचार करत असतानासुद्धा मी तोच विचार करतोय नाही का ?

“मी ते केलं नसत तर…”?